पनवेल : बातमीदार : मोबाईल फोन संदर्भात विचारपूस करण्यासाठी गेलेले असताना झालेल्या वादातून एका 40 वर्षीय महिलेस व अन्य इसमांना लाकडी फळीच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली आहे. राजू थळसे (17) यांचा मोबाईल फोन के. मॉलच्या पाठीमागे राहणार्या (उघड्यावर फुटपाथवर राहणार्या) पारधी मुलांनी घेतला असल्याचा त्यांचा संशय होता. म्हणून राजू व त्याचे मित्र हे त्याबाबत पारधी मुलांकडे विचारपूस करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्याच्यात शाब्दिक बाचाबाची होवून वाद झाला होता. त्याबाबत एनसी पनवेल शहर पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर राजू याने लक्ष्मी राम वाघमारे (वय 40 वर्षे) यांना घडलेला प्रकार सांगून पुन्हा पारधी मुलांकडे विचारपूस करण्यासाठी राजू थळसे व मनीष चव्हाण असे पारधी मुलांकडे गेले व त्यांना राजूच्या मोबाईल फोनबाबत विचारपूस करीत असताना 8 ते 9 पारधी मुलांनी राजू यास शिवीगाळ करून धमकी देण्यास सुरुवात केली. या वेळी मनीष चव्हाण व लक्ष्मी हे त्यांना समजवून सांगत असताना 8 ते 9 पारधी मुलांनी मिळून लक्ष्मी, राजू थळसे व मनीष चव्हाण यांना लाकडाच्या फळीने डोक्यात, पाठीत व पायावर मारण्यास सुरुवात केली. या मारहाणीत ते जखमी झाले आहेत. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्ववैमनस्यातून एकाला मारहाण
रसायनी : प्रतिनिधी : पूर्ववैमनस्यातून एका इसमास बेदम मारहाण केल्याची घटना रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. गुलसुंदे आकुलवाडी येथील योगेश वसंत मालुसरे (वय 30) हे वाहनावर चालक म्हणून काम करतात. रात्रीच्या सुमारास पाताळगंगा येथील रिलायन्स कंपनीत कार क्र. 46, एडी 1020 हिने कामावर जात असताना मारुती मोरे यांच्या कॉर्नरजवळ रोहित लिहे, राहुल पाटील, अंकुश भोईर, भरत पाटील, रोहित पाटील (सर्व रा. आकुलवाडी) यांनी योगेश मालुसरे यांची गाडी आडवून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या सर्वांनी शिविगाळ व दमदाटी करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी योगेश मालुसरे यांनी रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता मारहाण करणार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींना अद्याप अटक झाली नसून आरोपी फरारी आहेत. रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार अरविंद ठाकूर पुढील तपास करीत आहेत.