कामोठे : रामप्रहर वृत्त
आनंद बुद्ध विहार ट्रस्ट कामोठे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामोठे शहर यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांच्या 2566 जयंतीनिमित्त सोमवारी (दि. 16) कामोठे येथील नालंदा बुद्ध विहार येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले.
आरपीआयचे कामोठे शहराध्यक्ष रवींद्र कांबळे, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, प्रभाग समिती ‘क’च्या सभापती नगरसेविका अरुणा भगत, सामाजिक कार्यकर्ते आर. जी. म्हात्रे, भाजपच्या कामोठे महिला मोर्चाच्या अध्यक्षा वनिता पाटील, नालंदा बुद्ध विहार अध्यक्ष मंगेश धिवार आदी उपस्थित होते.