भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू आहेत. त्या अनुषंगाने उसर्ली बुद्रुक येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीमधून नवीन अंगणवाडी बांधण्यात येणार आहे, तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरुस्ती ही या निधीमधून करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन सोमवारी (दि. 16) भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामीण भागात शिक्षणापासून गरीब विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून वर्षभर श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वसा आमदार प्रशांत ठाकूर पुढे चालवत आहेत, असे मत तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी व्यक्त केेले. त्यांनी पुढे सांगितले. जिल्हा नियोजनाच्या निधीमधून 12.50 लाख रुपयांची विकास कामाचे भूमिपूजन आज माझ्या हस्ते होतेय याचा आनंद मला आहे.
या भूमिपूजन सोहळ्याला भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, माजी सरपंच नितीन काठावले, संभाजी वारदे, अनिल निंबाळकर, माजी उपसरपंच पंकज वारदे, ग्रामपंचायत सदस्य प्रितेश डांगरकर, कच्छीन्द्र ठाकूर, किरण डांगरकर, पोलीस पाटील (उसर्ली) दीपक पाटील, बाळाराम पाटील, वसंत काठावले, दशरथ डांगरकर, गानू डांगरकर, पांडुरंग काठावले, गुलाब डांगरकर, जयवंत पाटील, प्रदीप दळवी, अंगणवाडी सेविका रंजना गोलाडे, कांचन काठावले, अंकिता काठावले आदी उपस्थित होते.