Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे सुयश

पनवेल ः प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे.

शाळेचा निकाल 98.21 टक्के लागला असून, 20 विद्यार्थ्यांनी 75 टक्क्यांच्या, तर तब्बल 25 विद्यार्थ्यांनी 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत उज्ज्वल यश मिळवले. ओंकार सोबळे 92 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आला आहे. अवनित यादव या विद्यार्थ्यास गणितात 98 गुण मिळाले असून, तो गणितात शाळेत प्रथम आला. अवनितला 88 टक्के गुण मिळाले असून  तो दुसरा, तर मृणाली डुकरे या विद्यार्थिनीने 87.40 टक्के गुण मिळवत शाळेत तिसर्‍या क्रमांकावर येण्याचा बहुमान पटकावला. शाळेचे दहावीचे हे पहिले वर्ष असूनही विद्यार्थ्यांनी परिश्रमाने शाळेच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवत बाजी मारल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल माजी खासदार मॅनेजिंग कौन्सिल मेंबर ऑफ रयत शिक्षण संस्था व शाळेचे विश्वस्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, रयत शिक्षण संस्थेचे पीआरओ, रायगड विभाग कारंडे सर, कवितके सर, शाळेच्या पर्यवेक्षिका कुसुम प्रजापती, सबिना शेख, वैशाली म्हसकर यांसह सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply