Breaking News

जेएनपीएतील प्रकल्पांचा केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याकडून आढावा

विविध उद्घाटनांसह पहिल्या शाश्वतता अहवालाचे प्रकाशन

उरण : वार्ताहर

केंद्रीय बंदरे, जहाजवाहतूक व जलमार्ग आणि आयुष मंत्री, सर्वानंद सोनोवाल यांनी जेएनपीए बंदरास भेट दिली. आपल्या भेटीदरम्यान मंत्री महोदयांनी बंदरात नुकत्याच विकसित केलेल्या व डीएफसीशी सुसंगत असलेल्या रेल्वे यार्डचे आणि नुकत्याच नूतनीकरण केलेल्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केले. या वेळी सोनोवाल यांनी जेएनपीए बंदराचा पहिला सस्टेनबिलिटी रिपोर्ट प्रसिद्ध केला व बंदरातील विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचा आढावा घेतला.

जेएनपीए बंदराचे अध्यक्ष संजय सेठी व उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांनी केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि इतर मान्यवरांचे स्वागत केले. सोनोवाल यांना केंद्रीय औद्योगिक दलाच्या जवानांनी गार्ड ऑफ ऑनर दिला. जेएनपीए बंदरातील विविध प्रकल्पांबाबत केंद्रीय मंत्री महोदयांना माहिती देताना बंदराचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले, जेएनपीएमध्ये अनेक पायाभूत सुविधा आणि इतर विकासात्मक प्रकल्प व हरित बंदर उपक्रम सुरू आहेत. ज्यामुळे जेएनपी बंदराच्या व्यवसायात वाढ होईल व पर्यायाने देशाच्या आयात-निर्यात व्यापारास चालना मिळेल. आमचे सर्व प्रकल्प मंत्रालयाच्या उपक्रमांशी अनुरूप आहेत ज्यामुळे मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी, लॉजिस्टिक खर्चात कपात आणि व्यवसाय करणे सुलभ होते.

जेएनपीए देशाच्या आर्थिक विकासामध्ये महत्वपूर्ण योगदान देण्यासाठी वचनबद्ध आहे. वस्तू आणि सेवांच्या वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी आणि सर्वोत्तम यंत्रणा प्रदान करून तसेच व्यापार वर्गाच्या पसंतीचे बंदर बनून जागतिक पुरवठा साखळींमध्ये सखोल एकीकरणास समर्थन देण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत.

‘पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न’

या वेळी संजय सेठी म्हणाले, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाच्या दिशेने आमचे प्रयत्न प्रदर्शित करण्यासाठी आम्ही 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आमचा पहिला शाश्वतता (सस्टेनबिलिटी रिपोर्ट) अहवाल प्रसिद्ध केला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आम्ही आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत आहोत.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply