Breaking News

पंतप्रधान मोदी उद्या साधणार विविध योजनांच्या लाभार्थ्यांसोबत संवाद

अलिबाग : प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्यप्रणालीद्वारे देशभरातील केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांसोबत मंगळवारी (दि. 31) संवाद साधणार आहेत. सदर संवाद कार्यक्रम मंगळवारी 9 वाजता अलिबाग तालुक्यातील वेश्वी पी.एन.पी. नाट्यगृह येथे ऑनलाइन आयोजित करण्यात आला असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांनी दिली आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. ग्रामीण भागात या योजनांची जिल्हा परिषद प्रशासनाकडून प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजनांचा प्रचार, प्रसिध्दी करून, पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. या योजनांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), जलजीवन मिशन आणि अमृत योजना, प्रधानमंत्री स्व निधी योजना, एक राष्ट्र एक राशनकार्ड योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, आयुष्यमान भारत पीएम जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत हेल्थ अ‍ॅन्ड वेलनेस सेंटर आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना यांचा समावेश आहे.

सदर संवाद कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी  सदस्य, पंचायत समित्यांचे माजी सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांनी केले आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply