पनवेल ः प्रतिनिधी
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पनवेल महापालिका क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या योजनेअंतर्गत वाल्मिकी नगर, महाकाली नगर, लक्ष्मी वसाहत, कच्छी मोहल्ला, पटेल मोहल्ला, अशोकबाग, तक्का वसाहत या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये लाभार्थ्याला मिळणारे घर हे 30 चौरस मीटरचे आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पनवेल महानगरपालिकेतील झोपडपट्टी पूनर्वसनाच्या सहा सविस्तर प्रकल्प अहवालास केंद्र व राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून यावर्षी 2022मध्ये 75 वर्ष पूर्ण होत असून देशातील प्रत्येक कुटुंबाला जलजोडणी, शौचालयाची व्यवस्था, 24 तास वीज व रस्ता या सुविधांसह पक्के घर असायला हवे, असे विचारात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने नागरी भागाकरिता प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. झोपडपट्टी पुनर्वसनाबरोबरीने पनवेल शहर आणि आसपासच्या नागरिकांना महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेची माहिती देण्यात येते. आवश्यक कागदपत्रांची माहिती देऊन, आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पालिकेच्या वतीने प्रयत्न केले जातात. प्रधानमंत्री आवास योजना ही घटक क्र. 1 झोपडपट्ट्यांचा आहे, त्याच जागेवर पुनर्विकास करणे, घटक क्र. 2 आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणारी घरे, घटक क्र. 3 खासगी भागिदारीद्वारे परवडणार्या घरांची निर्मिती, घटक क्र. 4 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी व्यक्तिगत घरकुल बांधण्यास अनुदान असे विभागले आहे.
आम्ही दहा वर्षांपासून स्वत:चे घर घ्यायच्या विचारात होतो, पण आमच्याजवळ पुरेशी रक्कम नव्हती. त्याच वेळी मी पंतप्रधान आवास योजनेची जाहिरात पाहिली. पालिकेतील अधिकार्यांच्या मदतीने आम्हाला 2 लाख 67 हजारांची आर्थिक मदत मिळाली. शेवटी 11व्या वर्षी घर घ्यायचे आमचे स्वप्न पूर्ण झाले.
– मृणाल पेणकर, पळस्पे फाटा
एकूण लाभार्थी
घटक क्र. 1- आयएसएसआर- 455 (मंजुर लाभार्थी)
घटक क्र. 2- एएचपी – 1 हजार 434 (स्लम) (मंजूर लाभार्थी)
घटक क्र. 2- एएचपी/ईडब्ल्यूसी- 902 (मंजूर लाभार्थी)
घटक क्र. 2- एएचपी/एलआयजी 990 (मंजूर लाभार्थी)
घटक क्र. 3-सीएलएस – 20 हजार 522 (लाभ मिळालेले लाभार्थी)
RamPrahar – The Panvel Daily Paper