Breaking News

खारघरमध्ये आधुनिक गॅस शवदाहिनी; नगरसेवक प्रवीण पाटील यांचे प्रयत्न

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या प्रयत्नाने खारघर सेक्टर 14 मधील वैकुंठधाममध्ये लवकरच आधुनिक गॅस शवदाहिनी सुरू होणार आहे. त्यामुळे खारघरवासीयांचा नातेवाइकांचा मृतदेह घेऊन पनवेलला जाण्याचा त्रास वाचणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पनवेल महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. खारघरमध्ये त्याचेप्रमाण जास्तच आहे. कोरोनामुळे अनेकांचा मृत्यूही झाला आहे. खारघर सेक्टर 14 मध्ये असलेल्या वैकुंठधाम स्मशान भूमीत लाकडाची शवदाहिनी आहे. कोरोनाकाळात ती अपुरी पडत आहे. सिडकोच्या हस्तांतर कराराप्रमाणे पनवेल महापालिकेकडे हस्तांतर करताना वैकुंठ धाममध्ये गॅस शवदाहिनी देण्याचे ठरले आहे. ही गॅस शवदाहिनी तयार होती, पण तिचे हस्तांतर झाले नसल्याने तिचा वापर केला जात नव्हता. माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी वाढत्या कोरोनामुळे खारघर परिसरात मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी गॅस शवदाहिनी तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती.  या मागणीची दखल घेत सोमवारी (दि. 19) माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रवीण पाटील, सिडकोचे कार्यकारी अभियंता टी. बी. अहिरे, उप अभियंता एस. एच. सागर, चिरंतन उद्योगाचे विशाल केणी आणि राकेश भुजबळ यांनी गॅस शवदाहिनीची पाहणी केली. या वेळी सिडको अधिकार्‍यांनी दोन ते तीन दिवसांत ती कार्यान्वित करण्यात येईल असे सांगितले.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply