Breaking News

उरण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मधुकर ठाकूर यांची फेरनिवड

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

उरण तालुका दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मधुकर ठाकूर यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी महेश भोईर, चिटणीसपदी सुभाष कडू तर खजिनदारपदी जीवन केणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. उरण तालुका दैनिक पत्रकार संघाची सभा मंगळवारी (दि. 14) उरण येथील कार्यालयात झाली. या वेळी पत्रकार संघाची सन2022-2023 या वर्षांसाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीच्या सदस्यपदी जगदीश तांडेल, प्रदीप पाटील, सुर्यकांत म्हात्रे, राजकुमार भगत, अनंत नारंगीकर, दत्ता म्हात्रे, दिनेश पवार यांची निवड करण्यात आली आहे. तर संघाचे सल्लागार म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायदेविषयक सल्लागार म्हणून अ‍ॅड. पराग म्हात्रे व अ‍ॅड. सुमित म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकारी, सदस्यांना अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply