Breaking News

जिजाऊ रथाचे महाडमध्ये जल्लोषात स्वागत

महाड : प्रतिनिधी

राजमाता जिजाऊ मांसाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त सिंदखेडराजा येथून पाचाड येथे आलेल्या जिजाऊ रथाचे स्वागत शुक्रवारी (दि. 17) सकाळी नवयुग विद्यापीठ ट्रस्ट लाडवली (ता. महाड) येथे मोठ्या जल्लोषात करण्यात आले.

राजमाता जिजाऊ मांसाहेब यांचे जन्मगाव असलेल्या सिंदखेडराजा येथील त्यांच्या जाधवराव वंशजांनी जिजाऊ यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शक्तिस्थळ सिंदखेडराजा ते स्मृतिस्थळ पाचाड जिजाऊ रथयात्रेचे आयोजन केले होते. राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या रथाचे गुरुवारी महाड येथे आगमन झाले. नवयुग विद्यापीठ ट्रस्ट लाडवली येथे या रथाचे स्वागत करण्यात आले. या रथयात्रेसोबत राजमाता जिजाऊ यांचे सिंदखेडराजा येथील वंशज शिवाजीराजे जाधवराव, अशोकराव शिंदे, विजय काकडे, जयसिंगराव देशमुख, राजेंद्र दाते पाटील, किशोर चव्हाण, रवींद्र बोचरे पाटील, प्रशांत सोनवणे, टिळक बोस, सुधीर लंके, तुकाराम मचे तसेच असंख्य शिवभक्त होते.

जिजाऊ यांच्या पुण्यतिथी दिनी शुक्रवारी  सकाळी नवयुग विद्यापीठ ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. रणजितसिंह जाधवराव, अश्विनीराजे जाधवराव यांच्या हस्ते जिजाऊ यांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात आले. या वेळी  तनिष्क शेठ या विद्यार्थ्यांने दमदार आवाजात पोवाडा सादर केला तर गौतमी शिंदे या विद्यार्थ्यांनीने जिजाऊ यांच्या जीवनावर पोवाडा सादर केला. तसेच सीबीएसईचे विद्यार्थी व शिक्षक यांनी जिजाऊ मॉसाहेबांवर काव्य सादर केले.

नवयुग विद्यापीठ माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक मनोहर पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक वाल्मिक गढरी, सीबीएसईच्या मुख्याध्यापिका मनिषा हूडे, फार्मसी विभागाचे प्राचार्य सुनिल सावळे, हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे प्रमुख अनिकेत पाटील तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या वेळी उपस्थित होते. राजमाता जिजाऊ यांच्या रथामध्ये स्थापन केलेल्या पुतळ्याची विधीवत पूजा केल्यानंतर हा जिजाऊ रथ जिजामाता यांच्या समाधीस्थळी पाचाड येथे रवाना झाला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply