पनवेल : रामप्रहर वृत्त
येथील महापालिका हद्दीत मान्सून सक्रिय होण्यापूर्वी वेगाने कामे सुरू आहेत. या अनुषंगाने खारघर येथील मुर्बी आणि पेठगाव या भागात नालेसफाईच्या तसेच गावात सुरू असलेल्या रस्ते आणि गटारांच्या कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी पाहणी करून आढावा घेतला तसेच या कामासंदर्भात अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
या पाहणी वेळी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, नगरसेवक अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, पापा पटेल, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, युवा नेते समीर कदम, वासुदेव पाटील, सरचिटणीस किर्ती नवघरे, सचिन वास्कर, प्रभाकर जोशी, जयदास तेलवणे, महापालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्या प्रयोगशाळांवर कारवाई करणार
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्या …