पनवेल : रामप्रहर वृत्त
भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नवव्या स्मृतिदिनी शुक्रवारी (दि 24) आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात गायिका गीता सुभाष म्हात्रे व सीमा प्रकाश पराड (बडेकर) यांची भजन संध्या आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात वारकरी संप्रदायातील मान्यवरांचा प्रमुख पाहुणे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास कामगार नेते महेंद्र घरत, उद्योगपती जे. एम. म्हात्रे, 1984च्या आंदोलनातील रणरागिणी भारतीताई पवार तसेच प्रीतम म्हात्रे, दर्शना भोईर आदी उपस्थित होते.
या वेळी ह. भ. प. एकनाथ आत्माराम पाटील (ज्येष्ठ सनदी लेखापाल व कीर्तनकार) ह. भ. प. विनायक महाराज कांबेकर (ज्येष्ठ कीर्तनकार), ह. भ.प. अरुणबुवा कारेकर (शिल्पकार व गायक), ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी (संगीत विषारद, भजन सेवा) यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘दिबां’चे सुपुत्र अतुल पाटील, मंडळाचे उपाध्यक्ष जे. डी. तांडेल, सचिव बी. पी. म्हात्रे, सहसचिव विजय गायकर, सदस्य मेधा तांडेल, मनीषा तांडेल, मनस्वी पाटेकर यांच्यासह विद्याधर ठाकूर, पंढरीनाथ पाटील, खरे, विद्याधर पाटील यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास पत्रकार कटेकर, बाळकृष्ण म्हात्रे, व्ही. एन. ठाकूर, डी. बी.पाटील, काशिनाथ जाधव, तेजस पाटील, श्याम मोकल, श्री. ठाकूर, गणेश दाबणे, तुषार नाईक, अरुण म्हात्रे, राजू सावंत आदी मंडळीही हजर होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सहसचिव विजय गायकर यांनी केले.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …