नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी प्राथमिक विद्यालयात इयत्ता चौथीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बाल सभेचे आयोजन केले होते. सर्वप्रथम स्वागतगीताने पाहुण्यांचे स्वागत झाले. बाल सभेस अथर्व टिंगरे हा प्रमुख पाहुणा व वरिष्ठ शिक्षक युवराज धनवटे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. पाहुण्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सरस्वती देवीचे पूजन करण्यात आले आणि दीपप्रज्वलन करून पाहुणे स्थानापन्न झाले. कार्यक्रमात हर्षद माने, श्रेयश शेट्टे व संजिवनी यादव यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगितली. त्यानंतर या कार्यक्रमानिमित्त काही विद्यार्थ्यांनी प्रदूषण टाळण्यासंदर्भात घोषवाक्ये ऐकवली व या घोषवाक्यांद्वारे प्रदूषण कसे टाळता येईल याबाबत जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया घेरडे व स्वरा भिसे यांनी केले. वर्गशिक्षक श्री. मेंगाळ यांनी सुंदर फलकलेखन करून वातावरण निर्मिती केली. श्री. देशमुख यांनी बालसभेच्या कार्यक्रमाचे नियोजन केले. अर्णव शिंदे याने उपस्थितांचे आभार मानले व शेवटी ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.