Breaking News

कशेडी घाट होतोय अपघातप्रवण क्षेत्र

तांत्रिक बिघाडामुळे आठवड्यात दोन वाहनांचे नुकसान

पोलादपूर : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटामध्ये चौपदरीकरणाचे काम बहुतांशी पूर्णत्वास जात आहे. मात्र पावसाळ्यामुळे अवजड वाहनांना वेगनियंत्रण करताना अपघात होत असून वाहनांमध्ये तांत्रिक दोष निर्माण होत असल्याचेही दिसून आले आले आहे. गेल्या आठवड्यात चोळई आणि भोगाव येथे दोन वाहनांचे नुकसान झाल्याने कशेडी घाट पावसाळयामध्ये अपघातप्रवण क्षेत्र होत असल्याचे दिसून येत आहे.

कशेडी घाटाच्या प्रारंभी चोळई (ता. पोलादपूर) येथे सुंदरराव मोरे महाविद्यालयासमोर 15 जून  रोजी सायंकाळच्या सुमारास खेडकडून मुंबईकडे जाणारा एक कंटेनर (एमएच-46,एएफ-2947) महामार्गाच्या एकाबाजूला जाऊन कलंडला. यामुळे कंटेनरमधील रसायन महामार्गाच्या खाचखळग्यातून वाहू लागले.  कंटेनरचेही मोठे नुकसान झाले. 20 जून रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कशेडी घाट उतरताना भोगाव या गावाच्या हद्दीमध्ये एका कंटेनरच्या ड्रायव्हर केबिनमधील वायरिंगमध्ये बिघाड झाला तसेच पुढील बाजूच्या टायर्ससह केबिननेही पेट घेतल्याने झालेल्या अपघातात या कंटेनरचे प्रचंड नुकसान झाले.

वाहनावर नियंत्रण ठेवताना वाहनामध्ये तांत्रिक बिघाड होऊन अपघात होण्याच्या एकाच आठवड्यातील दोन घटनांमुळे कशेडी घाट पुन्हा अपघातप्रवण क्षेत्र होऊ पाहात असल्याचे दिसून येत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply