Breaking News

शॉर्टसर्किटमुळे अलिबागमध्ये इमारतीत आग

अलिबाग : प्रतिनिधी

शहरातील ब्राम्हण आळीमधील दत्त मंदिराजवळील  लक्ष्मीव्हीला इमारतीमधील एका निवासी सदनिकेमध्ये रविवारी (दि. 26) सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत सदनिकेतील साहित्य जवळून खाक झाले. सुदैवाने घरी कोणी नसल्याने जीवितहानी टळली.

आगीचे वृत्त समजताच अलिबाग नगरपालिकेचे बंब आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. तत्पुर्वी लक्ष्मीव्हीला सोसायटीमधील रहिवाशांनी पाण्याच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले होते. या आगीमुळे इमारतीच्या विद्युत केबलचे नुकसान झाले असून, महावितरणकडून केबल बदलण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply