Breaking News

खारघर उद्यानातील कामांचे मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतीमध्ये सिडकोने उद्याने उभारली, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची दुर्दशा झाली आहे. सिडकोमार्फत महापालिकेकडे उद्याने हस्तांतरित केल्यानंतर या उद्यानांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करण्याकरिता भाजपच्या महापालिकेचे स्थायी समिती सभापती अ‍ॅड. नरेश ठाकूर, महिला बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, शत्रुघ्न काकडे यांनी पाठपुरावा केला होता. त्याअंतर्गत रविवारी (दि. 26) खारघर सेक्टर 7 प्लॉट नंबर 20 येथील खेळाचे मैदान, ओपन जिम, वाचनालय, स्वछतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय व उद्यानातील कामाचे भूमिपूजन महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी महापालिकेचे स्थायी समिती सभापती अ‍ॅड. नरेश ठाकूर, महिला बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक प्रवीण पाटील, रामजी बेहरा, शत्रुघ्न काकडे, नगरसेविका अनिता पाटील, अभिमन्यू पाटील, माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर, महिला मोर्चा जिल्हा चिटणीस गीता चौधरी, मंडळ उपाध्यक्ष संजय घरत, सोशल मीडिया संयोजक अजय माळी, नमो नमो मोर्चाचे संतोष शर्मा, खारघर शहर सरचिटणीस साधना पवार, आश्विनी भुवड, प्रिया दळवी, क्षमा राव, शोभा मिश्रा, आरती मिश्रा, युवा मोर्चा खारघर शहर सरचिटणीस अमर उपाध्याय, उत्तर भारतीय मोर्चा संयोजक विनोद ठाकूर, युवा मोर्चा उपाध्यक्ष शुभ पाटील, खारघर सेक्टर 20 चे अध्यक्ष विलास आळेकर, नवनीत मारू, शैलेंद्र त्रिपाठी, जी.एन. गुप्ता, सुमित डोलस, सुरेश कुमार, किरण पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सिडकोने केवळ उद्याने बांधली आहेत, मात्र त्या उद्यानांमध्ये कामे करण्यासाठी भाजपच्या सर्वत्र पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या सहकार्याने नक्कीच पुढील काळात खारघर हे आदर्श शहर आम्ही बनवणार आहोत.
-परेश ठाकूर, सभागृह नेते, पनवेल मनपा

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply