सावळे गावातील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त
प्रजासत्ताक दिनाचे औचित्त साधून पिल्लई एचओसी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अॅण्ड टेकनॉलॉजिच्या एनएसएस शाखेच्या वतीने सावळे गावामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या रक्तदान शिबिरास एनएसएस शाखा प्रमुख रेखा धवन, डॉ. अविनाश गाताडे, पवार, सावळे गावचे नवनिर्वाचित सदस्य प्रशांत माळी, कांता कांबळे, सुरेखा कुरंगळे, सुनील माळी, रश्मी गाताडे, सतीश म्हस्कर, प्रगती जांभुळकर, माजी सरपंच बळीराम कांबळे, शिवाजी माळी, संतोष माळी, सदाशीव माळी गुरुजी, शिंदे, सुनील ना. माळी, राम गाताडे, किरण केदारी, कमलाकर माळी, भालचंद्र म्हसकर, सचिन केदारी, अरुण माळी, दिलीप माळी, विजय कुरंगले, महेश कुरंगले, राजेश पाटील, मनोज भंडारकर, प्रभाकर जांभुळकर, एनएसएस शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.
राज्यामध्ये कोरोनामुळे रक्ताचा तुडवडा भासत असल्याने योग्य वेळी रक्तदान शिबिर आयोजित केल्याने श्री साई ब्लड बँकने एनएसएस युनिटचे आभार व्यक्त केले.
याकुब बेग हायस्कूलमध्ये वृक्षारोपण उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलमधील याकुब बेग हायस्कूल व ज्यू.कॉलेज मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. पनवेल एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष इक्बाल हुसैन काझी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्राचार्य आसीम शरफुदिन पटेल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ध्वजारोहणानंतर शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इक्बाल हुसैन काझी, उपाध्यक्ष व पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक मुकीत काझी सचिव मोहम्मद नूर हसनमिया पटेल, सचिव अलीम अमिरुद्दिन पटेल, खजिनदार माज शाहनवाझ मुल्ला, सदस्य असिफ युसुफ शकूर, मोहम्मद हनीफ शरफुद्दीन मुल्ला (मासटर), उसामा गुलाम हुसैन पटेल, आफ्फान रफिक खामकर, अब्दुल कुडूस अब्दुल अजीज डोलारे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
मायनॉरिटी उर्दू गर्ल्स हायस्कूल, पनवेल
पनवेल : रामप्रहर वृत्त
पीपल्स अॅण्ड पेरेन्ट्स असोसिएशन, पनवेलद्वारा संचलित मायनॉरिटी उर्दू गर्ल्स हायस्कूल आणि मायनॉरिटी इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या संस्थेचे अध्यक्ष अजीत शब्बीर मुल्ला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी संस्थेचे सेक्रेटरी अब्दुलहमीद धुरू, खजांची अब्दुलसत्तार पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष जुबेर पिट्टू आदी संस्थेचे सदस्य तसेच मायनॉरिटी उर्दू गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कुदसिया प्रायमसवाला आणि इतर सह. शिक्षिका उपस्थित होत्या.
रिपब्लिकन पक्षातर्फे विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यूथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. तसेच पनवेल शहरात अनेक कार्यक्रम आयोजित केलेले होते. यामध्ये वडघर, चिंचपाडा, करंजाडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजित क्रिकेट सामन्यांना पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी जाऊन भेट दिली.
पक्षाच्या वतीने रायगड जिल्हा अध्यक्षतेखाली पेण शहरात बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत पक्ष कसा वाढेल व प्रत्येक गावागावात कसा पोहचेल, पनवेल शहर व पेण शहराच्या कमिटी फेरबदल करण्याबाबत, 20 मार्चचा महाड चवदार सत्याग्रहाचा कार्यक्रम याबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी रायगड जिल्ह्यातील सुनील कांबळे यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे महाराष्ट्रतील महिला आघाडी यांनी असंख्येने जाहीर प्रवेश केला .
या वेळी रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे, दिलीप नाईक, रिक्षा युनियन अध्यक्ष नरेश परदेशी, कार्याध्यक्ष विजय धोत्रे, माजी जिल्हाध्यक्ष संतोष अडसुले, जिल्हा युवा अध्यक्ष सागर जाधव, पेण तालुका अध्यक्ष अमित कांबळे, शहर अध्यक्ष नागेश सुर्वे, पनवेल शहर अध्यक्ष प्रकाश जाधव, तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड, अविनाश अडागळे, युवा कार्यकर्ते समीर घायतले, सलमान पटेल, भारत दाताड, असिफ शेख, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.