आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती
उरण : वार्ताहर
पिरकोन येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयमधील दहावी व बारावी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर शनिवारी (दि. 25) आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते वीरेंद्र देवस्थळी यांनी मुलांना विचारांनी मंत्रमुग्ध केले. प्राध्यापक कांगोरेंनी आमदार महेश बालदी यांचे कार्यक्रमाबद्दल अभिप्राय घेतले. आमदार महेश बालदी यांनी जीवनात उपयोगी येणारे विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, उरण पुर्व विभाग अध्यक्ष शशिकांत पाटील, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, सुदेश पाटील, भगत सर, पत्रकार तुळशिदास पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते मंगेश गावंड, तेजस ठाकूर, अशोक गावंड, पंढरी गावंड, जितेश गावंड, सुभेंद्र गावंड, दीपक गावंड आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला गोरख ठाकूर खोपटे यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन चेतन पाटील यांनी केले.