पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजमध्ये अभिवादन करण्यात आले.विद्यालयाचे उपशिक्षक सागर रंधवे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज बहुजनोद्धारक आणि अलौकिक प्रतिभेचे धनी तसेच प्रजाहितदक्ष लोकराजा होते असे प्रतिपादन केले. विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी, विद्यालयाचे पर्यवेक्षक दीपक भर्णुके, परीक्षा विभाग प्रमुख चित्रा पाटील, ज्युनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे, उपशिक्षक सागर रंधवे, क्रीडा शिक्षक जयराम ठाकूर, शिक्षक पालक संघाचे सचिव देवेंद्र म्हात्रे, देवकुळे, डी. आर. ठाकूर, दयानंद खारकर आदी उपस्थित होते.