Breaking News

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त वीर वाजेकर महाविद्यालयात व्याख्यान

उरण : वार्ताहर

रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात झाली. या निमित्ताने महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. राम गोसावी यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी जी. पवार या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या वेळी प्रा. राम गोसावी यांनी शाहू महाराज यांच्या क्रांतीकारी कार्याचा आढावा घेतला. वेदोक्त प्रकरण, तसेच स्त्री-पुरुष समानता, शिक्षण, शेती औद्योगिक, इत्यादी क्षेत्रांत केलेल्या कार्याची विस्तृत मांडणी केली. त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराज यांनी मांडलेल्या शैक्षणिक धोरणाचा आढावा घेतला. प्रा. चिंतामण धिंदळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. सुजाता पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रा. अपूर्वा देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास महाले, आयक्यूएसी समन्वयक डॉ. राहुल पाटील, तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply