Breaking News

कर्जतच्या फार्मसी महाविद्यालयाचा आयर्लंडच्या एआयटीबरोबर सामंजस्य करार

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार

कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर महाविद्यालय (कर्जत)आणि आयर्लंडमधील अ‍ॅथलोन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एआयटी) यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. झूम मिटींग या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर स्वाक्षरी समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या समारंभाची सुरूवात दोन्ही संस्थांच्या परिचयानंतर झाली. यावेळी राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाकडून प्राचार्य डॉ. मोहन काळे, सहाय्यक प्राध्यापिका व आंतरराष्ट्रीय संबंध संचालक डॉ. वैशाली जाधव आणि इतर प्राध्यापक सदस्य या कार्यक्रमास उपस्थित होते तर आयर्लंड एआयटीकडून कार्ल टूर्ले (आंतरराष्ट्रीय संबंधांचे उपसंचालक, युरोपियन युनियनचे नॉन मार्केट) ज्ञान व आरोग्य शाखा डीन डॉ. डॉन फॉलर, संचालक मेरी सिम्पसन या समारंभास उपस्थित होते. या सामंजस्य करार म्हणजे महाविद्यालयासाठी हा एक ऐतिहासिक क्षण होता.

डॉ. मोहन काळे आणि डॉ. वैशाली जाधव यांनी अभ्यास टूर, विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी शुल्कात सवलत, सहकारी संशोधन आणि विकास उपक्रम, संयुक्त संशोधन उपक्रमांची देवाणघेवाण, ज्ञान एक्सचेंजसाठी वेबिनार, प्राध्यापकांसाठी प्रशिक्षण अशा विविध बाबींवर एआयटी संस्थेच्या टीमशी संवाद साधला.

या सामंजस्य करारानुसार धारकर फार्मसी महाविद्यालय आणि आरआय विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण आणि संशोधन उपक्रमांसाठी विविध उज्ज्वल संधींचे दरवाजे उघडले आहेत तसेच या ज्ञान एक्सचेंज वेबिनार, नवोदित पिढ्यांचा दृष्टिकोनही विस्तृत करण्यासाठी निश्चितपणे मदत करतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्ल टूर्ले आणि डॉ. वैशाली जाधव यांनी केले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply