Breaking News

उरण महाविद्यालयात इतिहास विभागातर्फे सामाजिक न्याय दिन

उरण : रामप्रहर वृत्त

कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने सामाजिक न्याय दिन व राजश्री शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. आभासी ऑनलाइन माध्यमातून सामाजिक न्यायदिन आयोजित केला गेला या कार्यक्रमात प्रमुख वक्ते प्रा. डॉ. आर. एस. कोंडेकर (इतिहास विभागप्रमुख, राजिव गांधी महाविद्यालय, मुदखेड, जि. नांदेड) होते. त्यांनी राजर्षी छत्रपती शाहु महाराज जिवन व कार्य या विषयावर मार्गदर्षन करतांना शाहु महाराजांचे आरक्षण धोरण, त्यांची जलनिती, त्यांनी निर्माण केलेली सामाजिक समता, मल्ल विद्योला दिलेला आश्रय, बहुजन समाजाचे शिक्षण, प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तिचे, स्त्री शिक्षण इत्यादी विशयी सविस्तर मार्गदर्शन केले व खर्‍या अर्थाने त्यांनी सुराज्य निर्माण केल्याचे सांगितले. महाविद्यालयाचे प्रचार्य प्रा. डॉ. बळीराम एन. गायकवाड कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यांनी या वेळी राजर्षी शाहु महाराज हे द़ृष्टे राजकर्ते असून देशाच्या उभारण्ीत त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. ए. के. गायकवाड यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ. एम. जी. लोणे यांनी तर आभार आय. क्यु. ए. सी. समन्वयक प्रा. डॉ. ए. आर. चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमात विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply