Breaking News

पत्नीचा खून करणारा पती अडीच दिवसात जेरबंद

कर्जत : बातमीदार : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून, पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करून जंगलात पसार झालेल्या पतीला नेरळ पोलिसांनी अडीच दिवसात जेरबंद केले आहे. कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे आपल्या माहेरी राहत असलेल्या भीमा हिच्या डोक्यात रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास तिचा पती योगेश भला याने कोयत्याचे वार केले. त्यानंतर कोयता तेथेच टाकून तो बोरगावच्या जंगलात पळून गेला. दरम्यान, डोक्यात कोयत्याला वार झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भीमा हिचा काहीवेळाने त्याच ठिकाणी मृत्यू झाला. पळून गेलेल्या योगेशचा शोध घेण्यासाठी नेरळ पोलिसाची दोन पथके बोरगाव येथील जंगल पालथे घालत होती. योगेश भला फोंडेवाडी येथे जेवून पुन्हा जंगलात गेला असल्याची माहिती नेरळ पोलिसांना मंगळवारी (दि. 7) खबर्‍याकडून मिळाली. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक सोमनाथ जाधव हे चिकनपाडा मार्गे तर उपनिरीक्षक रतीलाल तडवी आणि सचिन सांगळे हे साळोख मार्गे फोंडेवाडी येथे खासगी वाहने घेऊन निघाले. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान योगेश  पोलिसांना दिसला, त्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला  नेरळ पोलीस ठाण्यात आणून चौकशी सुरू केली. त्यात योगेश भला याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात योगेश भला विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव अधिक तपास करीत आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply