पनवेल : वार्ताहर
दोन तरुणांकडून बेकायदा पिस्तूल ताब्यात घेण्यास खारघर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खारघर सेक्टर 12 येथील दोन तरुणांकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती खारघर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजीव शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मानसिंग पाटील, सपोनि घागरे, पोहवा धोत्रे, पोहवा जाधव, पोहवा आगा, पोशि शिंगाडे, मपोशि जगदाळ तसेच पोलीस मित्र शशांक आरोरा यांच्या पथकाने सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. सागर जानू ढेबे (23), राहुल विश्वनाथ गायकवाड (24) अशी या दोन तरुणांची नावे आहेत. सदर तरुण हे सराईत गुन्हेगार आहे. या दोघांकडून बेकायदा बाळगलेले पिस्तूल (देशी कट्टा) ताब्यात घेण्यात आली असून हे शस्त्र कोणत्या उद्देशाने खरेदी केले, कोणाकडून खरेदी केले याबाबतचा पुढील तपास खारघर पोलीस करीत आहे.