Breaking News

उद्योजक अशोक मित्तल यांचे बेकायदा बांधकाम पाडणार -जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

कोळगाव येथील अधिकृत बांधकाम निश्चित करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश

अलिबाग : प्रतिनिधी : तालुक्यातील मांडवा येथे असलेल्या लिटोलियर ग्रुपचे अशोक मित्तल यांच्या मालकीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रांताधिकारी यांनी वाढीव अनधिकृत बांधकाम पाडण्याबाबत नोटीस मित्तल याना दिली होती. त्यानुसार अशोक मित्तल यांनी काही बांधकाम स्वतःहून पाडण्यास सुरुवात केली आहे. तर राहिलेले अनधिकृत बांधकाम पाडण्याबाबत काँक्रीट कटरचा वापर करण्याची योजना असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. या बंगल्याचा काही भाग कायदेशीर आहे, त्याला धक्का न लावता, अधिकृत बांधकाम निश्चित करून ते पाडायचे आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

उच्च न्यायालयाने अशोक मित्तल यांचे अधिकृत असलेले 514 स्के.मी. बांधकाम सोडून इतर अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अधिकृत बांधकाम निश्चित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यासाठी सांगितले आहे. त्यानंतर उरलेले अनधिकृत बांधकाम हे काँक्रीट कटरच्या सहाय्याने पाडण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

अशोक मित्तल यांनी अलिबाग तालुक्यात कोळगाव येथे 8 फेब्रुवारी 1999 मध्ये पुर्वीच्या मालकाकडून पाच एकर जागा विकत घेतली होती. तत्पुर्वी या पाच एकर जागेत 514 स्के.मी. बांधकाम, एक पाण्याची टाकी व पाच मीटरपेक्षा जास्त उंच नसलेली भिंत बांधण्याची परवानगी रायगड जिल्हाधिकार्‍यांनी 4 डिसेंबर 1998 रोजी पुर्वीच्या मालकाला दिली होती. त्यानंतर त्या मालकाने ही जागा अशोक मित्तल याना विकली होती. मात्र आधीच्या मालकाला दिलेल्या बांधकाम परवानगी पेक्षा मित्तल यांनी सीआरझेडचे उल्लंघन करून 1407 स्के.मी.चे अनधिकृत वाढीव बांधकाम केले आहे. प्रसिद्ध उद्योगपती अशोक मित्तल यांचा कोळगाव येथील हॉलिडे रिसॉर्टमधील सीआरझेडचे उल्लंघन करून केलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश 1 नोव्हेबर 2018 रोजी मुबंई उच्च न्यायालयाने दिले होते. याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अलिबाग प्रांताधिकारी शारदा पोवार यांनी अशोक मित्तल यांना तीन महिन्याच्या मुदतीत बांधकाम स्वतःहून पाडावे अन्यथा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल अशी नोटीस दिली आहे. त्यानंतर अशोक मित्तल यांनी काही बांधकाम स्वतः पाडले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply