नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आम्रपाली ग्रुपविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आम्रपाली ग्रुपने आपले 38 कोटी 95 हजार रुपये थकवले असून, ते लवकरात लवकर आपल्याला देण्यात यावेत असा आदेश दिला जावा, अशी मागणी महेंद्रसिंह धोनीने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. धोनी आम्रपाली ग्रुपचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर राहिला आहे.
महेंद्रसिंह धोनीने 2009 पासून आम्रपाली ग्रुपसाठी जाहिराती केल्या आहेत. ब्रॅण्डचं प्रमोशन करताना धोनी अनेक जाहिरातींमध्ये झळकला होता, मात्र आर्थिक समस्या उभ्या राहिल्याने आम्रपाली ग्रुप अडचणीत आला होता.
सर्वोच्च न्यायालयात जवळपास 46 हजार जणांनी याचिका दाखल केली असून सर्व पैसे देऊनही अद्याप घर मिळालं नसल्याची तक्रार केली आहे.