Breaking News

नवी मुंबईतील गवते दामत्याने समर्थकांसह घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईच्या दिघा भागातील मातब्बर माजी नगरसेवक नवीन गवते, माजी नगरसेविका अपर्णा गवते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 19) माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात स्वगृही प्रवेश केला. त्यांनी बुधवारी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली.
या वेळी माजी नगरसेवक विकास झंजाड, परिवहन समितीचे माजी उपसभापती वीरेश सिंह, अथर्व गवते, माजी प्रभाग समिती सदस्य दामोदर कोटियन हेही उपस्थित होते. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वांना शुभेच्छा देत भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल, असे आश्वस्त केले.
संजीव नाईक आणि संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवीन गवते यांनी या वेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिघा येथील समस्या सोडविण्यासाठी निवेदन दिले. झोपडपट्ट्यांचा विकास आणि गरीब-गरजू नागरिक राहत असलेल्या घरांना संरक्षण देण्याची मागणी प्रामुख्याने यामध्ये करण्यात आली आहे. दिघा भागातील प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार गणेश नाईक यांच्या विकासाभिमुख आणि लोककल्याणकारी नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपत घरवापसी केल्याची प्रतिक्रिया नवीन गवते यांनी दिली. दिघा विभागाचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असून भाजपच्या माध्यमातून हे उद्दिष्ट निश्चित साध्य होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply