Breaking News

खारघरमध्ये माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते दैनिक बाजारांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
सिडकोने खारघर परिसराचा चांगल्या पद्धतीने विकास न केल्यामुळे नागरिकांना तसेच व्यापार्‍यांना अनेक सुविधांचा अभाव जाणवत होता. सिडकोने सर्व सोयीसुविधा देणे अपेक्षित होते, मात्र ते झाले नाही. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांनी पनवेल महापालिकेची स्थापना झाली आणि महापालिकेच्या वतीने माध्यमातून चांगल्या पद्धतीचा विकास खारघर शहरामध्ये होत असून नागरिकांना सुविधाही उपलब्ध होत आहेत, असे प्रतिपादन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी खारघरमध्ये दैनिक बाजारांच्या भूमिपूजनावेळी केले.
खारघरमध्ये आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे दैनिक बाजारांची निर्मिती केली जाणार आहे. त्यानुसार 12 कोटी 40 लाख 23 हजार 691 रुपयांच्या निधीमधून खारघरमधील 15 भूखंडांवर दैनिक बाजार सुरू करण्यात येणार आहेत. या बाजारांच्या कामांचे भूमिपूजन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 12) झाले.
या कार्यक्रमास भाजप खारघर शहर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, निलेश बाविस्कर, नरेश ठाकूर, माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय, नेत्रा पाटील, जिल्हा सचिव कीर्ती नवघरे, उपाध्यक्ष संजय घरत, समीर कदम, प्रभाग क्रमांक 6चे अध्यक्ष वासुदेव पाटील, उपाध्यक्ष किरण पाटील, शहर उपाध्यक्ष अजित अडसूळ, अमर उपाध्याय, शिवसेना शहरप्रमुख प्रसाद परब, भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष साधना पवार, विनोद ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष नितेश पाटील, प्रवीण बेरा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Check Also

उलवे नोड सी-फूड फेस्टिव्हलचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

उलवे नोड ः रामप्रहर वृत्तराज्यातील मत्स्य व्यवसायामध्ये मोठी क्षमता असून त्यासाठी बजेट वाढवून विकासाला गती …

Leave a Reply