Breaking News

राष्ट्रवादीत पक्षांतराच्या बातम्या चुकीच्या; रवींद्र इथापे यांचा खुलासा

नवी मुंबई : बातमीदार

मी भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत  असा खुलासा नवी मुंबई महापालिकेचे माजी सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची रवींद्र इथापे यांनी मंगळवारी (दि. 15) त्यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली. या भेटीचा संदर्भ देत रवींद्र इथापे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चुकीच्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या. वास्तविक चाकण येथे आपल्या हॉटेलच्या उद्घाटन समारंभासाठी शरद पवार यांना आमंत्रण देण्यासाठी गेलो होतो. या वेळी आपल्या सोबत नवी मुंबई महापालिकेचे माजी परिवहन समिती सभापती प्रदीप गवस तसेच चाकणचे स्थानिक आमदार दिलीप मोहिते-पाटील हेदेखील होते. शरद पवार यांच्या सोबतची भेट संपूर्णपणे वैयक्तिक स्वरूपाची होती. त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा अथवा पक्षांतराची चर्चा झालेली नाही. मी भारतीय जनता पक्षात आहे आणि भारतीय जनता पक्षातच राहणार आहे, असे रवींद्र इथापे यांनी स्पष्ट केले आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply