Breaking News

सुधागड कवेळे येथे बोअरवेल ट्रक उलटला

एकाचा जागीच मृत्यू, चार जण जखमी

पाली : रामप्रहर वृत्त

चालकाचा ताबा सुटल्याने सुधागड तालुक्यातील कवेळे गावाजवळ घाट वळणार सोमवारी (दि. 31) सायंकाळी बोअरवेल ट्रक पलटी झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून चारजण जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पाली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

ट्रक चालक छोटू यादव (वय 28, मुळ रा. मध्यप्रदेश) हा महागाव येथून बोअरवेल ट्रक घेवून कवेळे उद्धरमार्गे वाकणकडे वेगाने चालला होता. कवेळे येथे घाट उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रक रस्त्याच्या बाजूला पलटी झाला.

ट्रकमधील कामगार प्रेमसुखदास पन्हरिया (वय 40, मूळ रा. मध्यप्रदेश) याच्या अंगावर ट्रकमधील ड्रिलिंग रॉड पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रकमधील विकास रघुवंशी यास गंभीर दुखापत झाली. ललित वरकडे, ट्रक चालक छोटू यादव व जयदीपकुमार रघुवंशी यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

या अपघातास ट्रक चालक छोटू यादव याला जबाबदार धरून त्याच्यावर पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार एम. डी. बहाडकर करत आहेत.

Check Also

कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक

कठोर उपाययोजना करणार -वनमंत्री गणेश नाईक पनवेल : रामप्रहर वृत्तकोकणातील आंबा व काजू बागांचे वणव्यांमुळे …

Leave a Reply