Breaking News

रायगड जिल्हा कॅरम स्पर्धेत पनवेलचा सुरेश बिस्ट अजिंक्य

कर्जत ः प्रतिनिधी

रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनच्या वतीने कॅरम दिन तसेच असोसिएशनचे माजी कार्यवाह स्व. नथुराम पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वैभव राज कॅरम क्लब आयोजित जिल्हा कॅरम अजिंक्यपद व निवड स्पर्धा झाली. स्पर्धेत पुरुष खुल्या गटात पनवेलच्या सुरेश बिस्टने अजिंक्यपद पटकावले. महिला खुल्या गटात खोपोलीच्या अनिता कनोजिया तर वयस्कर गटात कर्जत सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा वाघमारे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेत 117 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मुख्य पंच म्हणून विजय टेमघरे, सहाय्यक पंच म्हणून राजेश भूतकर तर तांत्रिक अधिकारी म्हणून दीपक साळवी यांनी काम पाहिले. अजिंक्यपद पटकावणार्‍या सुरेश बिस्ट यांना ज्येष्ठ कॅरम पटू स्व. रामकृष्ण दिवेकर यांच्या स्मरणार्थ उदय दिवेकर यांजकडून रोख सात हजार रुपये तसेच असोसिएशनच्या वतीने फिरता चषक देऊन पत्रकार विजय मांडे, असोसिएशनचे कार्यवाह दीपक साळवी, खजिनदार वैभव पेठे, सदस्य अमित यादव, नंदकुमार दिवेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत पुरुष खुल्या गटात प्रथम सुरेश बिस्ट, द्वितीय अविनाश देशमाने, तृतीय स्वप्नील पनवेलकर, चतुर्थ वैभव शिंदे, पाचवा उत्तम गोरेगावकर, सहावा महेंद्र चोगले, सातवा आश्रब खान आणि आठवा क्रमांक सचिन नाईक यांनी मिळविला. महिला गटात प्रथम अनिता कनोजिया, द्वितीय वेदा शेट, वयस्कर गटात प्रथम कृष्णा वाघमारे, द्वितीय पोपट कवाड यांनी मिळविला.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply