Breaking News

कामोठ्यात सकल हिंदू समाज पदयात्रा

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त

देशभरामध्ये हिंदू नववर्ष शोभायात्रा, श्री रामनवमी, हनुमान जयंती मिरवणुकांवरील हल्ले, हिजाब आंदोलनापासून ते नुपूर शर्मा यांच्या समर्थकांचे झालेले खून या सर्व देशभर होणार्‍या घटनांना वाचा फोडण्यासाठी कामोठ्यात रविवारी (दि. 25) हिंदू समाज जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर सहभागी झाले होते. देशात हिंदू लोकांचे सण आणि यात्रा यांच्यावर होणार्‍या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी हिंदू धर्मियांनी सकल हिंदू जागरण यात्रेचे आयोजन केले होते. कामोठे शहरात यानिमित्त पदयात्रा निघाली. या पदयात्रेत मोठ्या संख्येने हिंदू धर्मीय लोक सहभागी झाले होते. हिंदू समाजावर अन्याय होत असेल आणि समाज शांत बसेल ही अपेक्षा केली जात असेल, तर हिंदू समाजाला याच्यापेक्षा तीव्र प्रतिक्रिया द्यावी लागेल, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी केले.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply