Breaking News

‘त्या’ सहा धावा चुकीच्याच

पंचांनी दिली कबुली

कोलंबो ः वृत्तसंस्था

वन डे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ओव्हर थ्रोच्या सहा धावा देण्याचा माझा निर्णय चुकीचाच होता; पण त्याचा मला खेद वाटत नाही, हे उद्गार आहेत श्रीलंकेचे पंच कुमार धर्मसेना यांचे. वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत ‘ओव्हर थ्रो’ आणि त्यामुळे इंग्लंडला लाभलेल्या सहा धावांची सर्वाधिक चर्चा झाली. तो निर्णय देणारे पंच धर्मसेना यांनी या रविवारी (दि. 21) प्रथमच त्याबाबत भाष्य केले.

चुरशीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडच्या गुप्टीलने डीपवरून केलेला थ्रो इंग्लंडचा फलंदाज स्टोक्सच्या बॅटला लागून अनाहूतपणे सीमारेषेच्या पार झाला. फलंदाजांनी दोन धावा काढल्याचे धर्मसेना यांना वाटले आणि ओव्हर थ्रोमुळे मिळालेला चौकार अशा सहा धावा त्यांनी इंग्लंडला बहाल केल्या. ज्यामुळे ही फायनल सुपर ओव्हरमध्ये गेली. तिथेही बरोबरी झाल्याने इंग्लंडला चौकारांच्या संख्येवरून जगज्जेते घोषित करण्यात आले. टीव्हीवर रिप्ले पाहून माझी चूक काढणे खूपच सोपे आहे. मीदेखील नंतर रिप्ले बघितला तेव्हा माझी चूक कळली. ती मी मान्य करतो, असे धर्मसेना सांगतात.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply