Breaking News

रायगडच्या कराटेपटूंकडून राष्ट्रीय स्पर्धेत पदकांची लयलूट

उरण : बातमीदार
कर्नाटकमधील बंगळुरू येथे झालेल्या 34व्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी विविध वजनी गटात कुमिते व काता प्रकारात पदके पटकाविली. या स्पर्धेत विविध 17 राज्यांतील 350 खेळाडूंनी सहभाग घेतला.
यामध्ये अमिता घरत, विनया पाटील, शुभम ठाकूर, श्रेय मोकल, श्रेयस वटाणे दोन सुवर्ण, अमिषा घरत, आर्वी केदारी, समीक्षा पाटील, आकाश भिडे, ऋग्वेद जेधे एक सुवर्ण व रौप्य, कार्तिकी पाटील, नेत्रा गावंड, हंसिका मोकल एक सुवर्ण व कांस्य, रोहित घरत, हर्षा ठाकूर सुवर्ण, ऋतुजा ठाकूर, मानसी ठाकूर, वैदही घरत, मनस्वी पवार हिने एक रौप्य व कांस्यपदक जिंकले.
यापैकी अमिता, अमिषा, कार्तिकी, आर्वी, समिक्षा, नेत्रा, हर्षा, हंसिका, रोहित, शुभम, रूग्वेद, श्रेय, श्रेयस यांची नोव्हेंबर 2022मध्ये मलेशिया येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूंना राजू कोळी, गोपाळ म्हात्रे, राकेश म्हात्रे, सुलभा कोळी, अपर्णा मोकल, विघ्नेश कोळी, निकीता कोळी यांनी मार्गदर्शन केले. विजेत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply