पनवेल : रामप्रहर वृत्त
आपल्या नगरसेवक निधीतुन विकास कामांना सातत्याने प्राधान्य देत प्रभागात नवनवीन सुधारणा घडवून आणणारे पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्र. 17चे भाजपचे नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी नगरसेवक निधीतुन शिवाजी नगर, पनवेल एस. टी. डेपोच्या बाजुला, पनवेल रेल्वे स्टेशन रोड या ठिकाणी उभारलेल्या सार्वजनिक सभागृहाचे तसेच बोअर वेलचे (हातपंप विहीर) लोकार्पण कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते नुकताच करण्यात आले. या वेळी प्रभाग समिती ’ड’ सभापती सुशिला घरत, नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे, विजय म्हात्रे, प्रशांत फुलपगार, जितेंद्र वाघमारे, विनोद जोशी, अशोक आंबेकर, श्याम साळवी, रावसाहेब खरात, राहुल वाहुलकर, सतीश बोर्डे, विजय झरे, किशोर वाहुलकर, दीपक वाहुलकर, रुपेश वाहुलकर, आनंद जाधव, नंदा टापरे, झरीना शेख, शैला आंबेकर, लक्ष्मी चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.