रोहे ः प्रतिनिधी
आज मला आनंद वाटत आहे की आमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.त्यामुळे मी महीला कार्यकर्त्यांचा अभिनंदन करतो.देशाची आर्थिक ताकत तुमच्यात आहे.त्यामुळे महीला ना सक्षम केले तर कुटुंब सक्षम होईल.यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सामान्यापासुन सर्वांन साठी अनेक योजना आणल्या.या योजना मातृशक्तीशी निगडीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व योजना मातृशक्तीला स्वाभिमान, सन्मान व स्वलंबनसाठी आणले असल्याचे अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित रायगड लोकसभा प्रवास योजना अंतर्गत रोहयात महीला मोर्चा प्रतिनिधी बरोबर संवाद साधताना मातोश्री मंगल कार्यालयात अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल हे मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष आ.प्रशांत ठाकुर,माजी आ.विनय नातू,भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग,रवी मुंडे,वैकुंठ पाटील,राजेश मापारा,मारुती देवरे,महीला मोर्चा जिल्हा अध्यक्षा हेमा मानकर,सरचिटणीस श्रध्दा घाग,जिल्हा उपाध्यक्ष मेघना ओक,तालुका अध्यक्षा जयश्री भांड,शहर अध्यक्ष ज्योती सनीलकुमार,संगिता फाटक, महीला मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आ.प्रशांत ठाकुर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. त्या लोकांपर्यंत आपण सर्वांनी पोहचविण्याची आवश्यकता आहे.या योजना लोकांपर्यंत पोहचल्यात का नाही हे पहाण्यासाठी स्वता केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल हे आले आहेत.त्यांनी लसीकरण केंद्र,रेशन दुकान सह अन्य ठिकाणी भेटी दिल्या असल्याचे सांगितले.आपल्या प्रास्ताविकात महीला मोर्चा अध्यक्षा जयश्री भांड यांनी आ.प्रशांत ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम चालु आहे.जिल्हा अध्यक्षा हेमा मानकर यांचे सहकार्य लाभत असल्याचे सांगत महीलांना काम देण्याची मागणी केली. यावेळी भाजप महीला मोर्चा चे पदाधिकारी,महीला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.