Breaking News

पर्यटकांना खुणावतेय माथेरान

कर्जत ः बातमीदार

पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या माथेरानचा दिवाळी पर्यटन हंगाम सुरू झाल्याने मुलांना दिवाळीची सुटी पडताच मुंबई-पुण्यापासून अगदी जवळचे आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यातील सुंदर थंड हवेचे डेस्टीनेशन माथेरान सध्या पर्यटकांच्या वर्दळीने बहर घेत आहे. आधीच लांबलेल्या पावसाने दिवाळीच्या पहिल्या दिवशीच विश्रांती घेतल्याने येथील परिसर हा विपुल वृक्षांनी सजलेला असताना हिरवीगार वनराई पर्यटकांना साद घालत आहे. पर्यटकही त्या हाकेला साकारात्मक प्रतिसाद देत आहेत. दीपावलीमध्ये आता पर्यटक येऊ लागल्याने येथील नागरिक, व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे. निसर्गात पर्यटक हरवताना दिसत आहेत.

 माथेरानमध्ये वेगवेगळी 38 प्रेक्षणीय स्थळे आहेत. आरोग्यदायक व उत्साहवर्धक हवामान, अतुलनीय निसर्गसौंदर्य व जोडीला थंड हवा यामुळे माथेरानला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. येथील चिक्की, मध, घोड्याची रपेट, हातरिक्षा सवारी, प्रेक्षणीय स्थळावरील मनोरंजनासाठी गेम्सची मजा, गोळा, मका, मॅगी अशा अनेक खाद्यपदार्थांची लज्जत येथे फिरण्याबरोबर पर्यटकांना घेता येते. येथील महत्त्वाचे आकर्षण असलेली माथेरानची राणी म्हणजे मिनीट्रेन अतिवृष्टीच्या काळात काही महिन्यांसाठी बंद झाली असली तरी येथील निसर्गाच्या सान्निध्यात पायी चालण्याचा आनंद काही औरच. मिनीट्रेनची सफर करण्यासाठी आम्ही पुन्हा माथेरानला येणार, असा विश्वास पर्यटक व्यक्त करताना दिसत होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply