मोहोपाडा : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील तुपगाव येथील मुस्लिम बांधवांनी गणपती बाप्पावर विसर्जनादरम्यान पुष्पवृष्टी केली. त्याचप्रमाणे गणेशभक्तांना प्रसाद वाटून ऐक्याची परंपरा जपली.
तुपगाव येथील यासीन भालदार, शरीफ भालदार व अन्य मुस्लिम बांधवांनी रायगड पोलीस दल अंतर्गत खालापूर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आणि तुपगाव ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील हनुमान मंदिराजवळ शामियाना उभारून गणपती बाप्पावर फुलांचा वर्षाव केला तसेच गणेशभक्तांना बुंदीच्या लाडूचे प्रसाद म्हणून वाटप केले. ग्रामस्थांनीही आपले गणपती व गौरीमाता हनुमान मंदिराजवळ घेऊन जात मुस्लिम बांधवांना साथ दिली.
याबद्दल बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार म्हणाले की, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जतन करण्यासाठी एक पाऊल पुढे ही संकल्पना रूजविण्याचा प्रयत्न दोन्ही समाज करीत आहेत, तर रायगडभूषण ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. वसंत कुंभार यांनी सांगितले की, यासीन भालदार हे त्यांच्या वडिलांचे समाजसेवेचे व्रत पुढे नेत आहेत.
या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी, रूपेश दळवी, सुरेश गुरव, योगेश गुरव यांच्यासह मुस्लिम बांधव, भगिनी उपस्थित होते.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …