पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलचे कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक निधीतून चिपळे गावातील शिवशंकर मंदिर ते चिपळे स्टॉप या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. या कामाचे भूमिपूजन पनवेल तालुका भाजप अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे मार्गदर्शन व तालुका भाजप युवा मोर्चा सरचिटणीस विश्वजीत पाटील यांचा पाठपुरावा यामुळे काँक्रिटीकरणाचे काम सुरू होत आहे.
या वेळी उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पनवेल पंचायत समिती सदस्य व पनवेल भाजप युवा मोर्चा अध्यक्ष भूपेंद्र पाटील, पळस्पे विभागीय भाजप अध्यक्ष अनेश ढवळे, पनवेल तालुका भाजप युवा मोर्चा सरचिटणीस विश्वजीत पाटील, चिपळे ग्रामपंचायत मा. उपसरपंच धनंजय पाटील, पनवेल तालुका शिवसेना संघटक रामदास पाटील, के. एन. पाटील, अंकुश पाटील, विठ्ठल पाटील, परशुराम पाटील, हौशिरम फडके, दिलिप पाटील, तुकाराम पाटील, दिनकर पाटील, चाहू पाटील, विष्णू पाटील, हरीश पाटील, महेंद्र पाटील, अजय पाटील, रोहित पाटील, केतन पाटील, रवी पाटील, नारायण पाटील, विजय पाटील, समीर पाटील, प्रणील फडके, अक्षय पाटील, आकाश पाटील, धीरज म्हात्रे, किरण पाटील, नीलेश पाटील आदी भाजप, शिवसेना कार्यकर्ते व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.