खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातांची मालिका सुरू असून मंगळवारी (दि. 6) पहाटे माडप बोगद्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव इको कारने धडक दिली. या अपघातात कारमधील दोन प्रवासी जागीच ठार, तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एक्स्प्रेस वेवर सोमवारी दोन अपघात होऊन 12 जण जखमी झाले. जखमींमध्ये आपत्कालीन कर्मचारी आणि पोलिसांचाही समावेश आहे. त्यानंतर मंगळवारीही अपघात झाला. सातार्यातून नवी मुंबईकडे येणारी एक मारुती इको कार (केए 56 2799) माडप बोगद्याजवळ टायर बदलण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या अपघातात कारमधील लक्ष्मी विठ्ठल कोंढाळकर (वय 24) व गणेश बाळू कोंढाळकर (वय 22, रा. कोंढावळे, ता. वाई, जि. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला, तर 10 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहेत.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …