अलिबाग ः जिमाका
रायगड जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींची पदे अनुसुचित जाती, जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, व सर्वसाधारण महिलांसाठी सोडत पध्दतीने आरक्षित करण्यासाठी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात मंगळवार, 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. शासन ग्रामीण विभागाकडील प्राप्त अधिसुचनेनुसार ही सभा आयोजित करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य स्तरावरील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचा प्रत्येकी एका प्रतिनिधीस पंचायत समिती सभापतीपदांच्या आरक्षणाच्या सभेस उपस्थित राहता येईल.