नगरसेविका हेमलता म्हात्रे यांच्या प्रभागात बस थांब्याचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त
महापलिकेच्या नगरसेविका हेमलता म्हात्रे यांच्या नगरसेवक निधीमधून साईनगर आणि लायन्स गार्डन येथे बस थांबा सुरु करण्यात आला आहे. या बस थांब्याचे उद्घाटन महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या वेळी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, नगरसेवक निलेश बावीस्कर, तसेच सचिन गमरे, गणेश म्हात्रे, रूपेश घाग, हेमंत म्हात्रे, आकाश डोंगरे, प्रवीन डोंगेरे, उज्जला पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.