भिमराव पोवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य
पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य भिमराव पोवार यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून खांदा कॉलनी सेक्टर 12 येथे स्वखर्चातून वाचनालय उभे केले आहे. ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र व मोफत पेपर वाचन हेच उद्दिष्ट ठेवून खांदा कॉलनी येथे उभारण्यात आलेल्या या तिसर्या वाचनालयाचे लोकार्पण पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भाजप बुथ अध्यक्ष राजू महापूरकर, सुहास पाटील, अशोक सावंत, मारुती निकम, श्री. सोनावणे, सुनील मोहिते, भास्कर भोईर, अंबादास जाधव, खंडेराव सिंग, एकनाथ, दीपक सिंग, श्याम भालेराव, सचिन नागतिलक, श्री. वायकर, श्री. रिचवाढ, सामाजिक कार्यकर्ते भास्कर भोईर, राहुल पोवार आदी उपस्थित होते. सर्वांनी पोवार यांना शुभेच्छा दिल्या.