Breaking News

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे बुधवारी (दि. 7) शिक्षक दिन साजरा करण्यात आला. 5 सप्टेंबर हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. या क्षणाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड यांनी  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलन केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक राहुल कांबळे यांनी केले. तसेच या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वेगवेगळी नृत्य व गीते सादर करून सर्व शिक्षकांचे मनोरंजन केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सर्व प्राध्यापकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. प्राचार्य डॉ. रुपेंद्र गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हायस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply