Breaking News

ब्रेस्ट कॅन्सरसंदर्भात जनजागृती रॅली

पनवेलमध्ये महिलांसाठी ‘रोटरी’चा उपक्रम

पनवेल ः वार्ताहर

येथील रोटरी क्लब आणि इनरव्हील क्लबच्या वतीने पनवेलमध्ये महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरसंदर्भात जनजागृती बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. अर्चना परेश ठाकूर यांनी झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली. या उपक्रमावेळी रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीच्या अध्यक्ष ध्वनी तन्ना, मेन्टोर क्लबचे हर्मेश तन्ना, सिम्पल आचालिया, इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटीच्या अध्यक्ष हेतल बालड, सचिव गिरा चव्हाण, बिजल मिराणी, ममता ठाकूर, डॉ. फोरम ठक्कर, डॉ. वैभव ठक्कर आदी उपस्थित होते. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. या रॅलीची सुरुवात पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृह येथून करण्यात आली, तर ओरियन मॉल येथे समारोप झाला. महिलांना आपण अनेकदा ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रस्त झालेल्या पाहतो. त्यांना या आजाराचा सामना करताना औषधोपचारासह मानसिक आधार व हिमतीची गरज असते. अशा रॅलीमुळे सर्वांना याचे गांभीर्य कळेल, असे मत अर्चना ठाकूर यांनी या वेळी व्यक्त केले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply