छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई ः प्रतिनिधी
मराठा आंदोलकांना पोलीस प्रशासनाने फोन करून आणि नोटीसी बजावून दबाव आणण्याचा प्रकार सुरू केला आहे. राज्य सरकारने हे तत्काळ थांबवावे, अशा आशयाचे पत्र छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. सोशल मीडियावर त्यांनी हे पत्र शेअर केले आहे.
प्रशासनाने सहकार्य न करता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास ते चिघळण्याचीच शक्यता जास्त आहे, असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे. तसे होऊ नये यासाठी आंदोलकांना पोलीस आणि प्रशासनाने सन्मानाची वागणूक द्यावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.