खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात सोमवारी (दि. 3) राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत ‘सेवा अधिकार कायदा 2015’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
व्याख्यानासाठी कोकण भवन येथील माजी आयपीएस अधिकारी डॉ. किरण जाधव हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये सेवा अधिकार कायदयाचे महत्त्व व या कायद्यांतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया त्यासाठीचे कागदपत्र व त्याचे महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती दिली.
प्राचायर्र् डॉ. रूपेंद्र गायकवाड यांनी सर्व उपस्थितांना सेवा अधिकाराचे आपल्या जीवनात असणारे महत्त्व समजावून सांगितले. या व्याख्यानासाठी अंतर्गत गुणवत्ता सिदधता कक्षाच्या समन्वयक प्रा. महेश्वरी झिरपे, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. प्रथमेश ठाकूर, यांनी केले तसेच डॉ. महादेव चव्हाण, प्रा. भाग्यश्री शुक्ला, प्रा. कावेरी घोगरे, प्रा. राजशी म्हात्रे यांनी सहकार्य केले.