महात्मा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री जयंतीही साजरी
पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय, इंग्रजी माध्यमात शनिवारी (दि. 1) सरस्वती पूजन करण्यात आले तसेच महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्याक संतोष चव्हाण यांनी सरस्वतीची पूजा करून महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
पर्यवेक्षिका निरजा यांनी आणि शिक्षकांनी दीपप्रज्वलन करून देवीला वंदन केले. कार्यक्रमाच्या सुरूवाला देवीचा श्लोक आणि अंबेचा गोंधळ शाळेच्या गायकवृदांनी सादर केला. गायत्री पाटील आणि प्रगती जाधव यांनी या तिन्ही दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. पर्यवेक्षिका निरजा यांनी नवरात्र अणि या महापुरूषांची जयंती साजरी करण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांना सांगुन मार्गदर्शन केले.
सर्व विद्यार्थ्यांनी सरस्वती देवीचे आशीर्वाद घेतले. अतिशय मंगलमय वातावरणात हा कार्यक्रम केल्याबद्दल मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.