खोपोली : प्रतिनिधी – रविवारी रात्री एक बस 30 मजुरांना घेऊन खोपोलहून कर्नाटककडे रवाना झाली झाली. सर्व मजुरांना बसमध्ये बसवण्या आगोदर बस आतील बाजुने सॅनिटायझेशन करुन घेण्यात आली. खोपोली व परिसरातील हे मजुर होते कर्नाटकमधील ता.बसवकल्याण जि. गुलबर्गा येथे 30 मजुरांसह पाच छोट्या मुलांना या बसने पाठवण्यात आले. सर्व मजुरांना या वेळी मास्कचे वाटण्यात आले. तसेच काही मास्क बसचालकाकडे ठेवण्यात आले. बस सुटण्या आगोदर पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग यांच्या हस्ते श्रीफळ फोडण्यात आले.
या आगोदर ही एक बस कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्यतील चिचोंली येथे मजुरांना घेऊन सोडण्यात आली. त्यामध्ये 29 प्रवाश्यांसह छोटी मुलांसहीत 50 जण प्रवासी होते. खोपोली व परिसरात अडकलेल्या मजुरांना गावी पाठवण्याकरीता ट्रान्सपोर्ट व्यवसाईक उच्चप्पा वरचाली तसेच सुफी ट्रँव्हलचे रहीम भाई सोरठिया यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी गावी जाणार्या मजुरांनी खोपोली पोलीसांचे आभार ही मानले.
या वेळी खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक धनाजी क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरिक्षक सतीश असवर, पोलीस उप निरिक्षक अमोल वळसंग, पो.ऊ.नि. जे सी मुल्ला, हेड काँ. अजिक्य पाटील यांच्या सह कर्मचारी वर्ग उपस्थित होते.