पनवेल ः रामप्रहर वृत्त
कामोठे सेक्टर 35 येथे नव्याने श्री डेंटल केअर हा दातांचा दवाखाना डॉ. श्रृतीका ननावरे यांनी हे दवाखाना सुरू केला आहे. त्याचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 12) झाले. कामोठे परिसरात शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे परिसरात नवनवीन उद्योग सुरू होत असून त्याचबरोबर आरोग्य सुविधाही नागरिकांना मिळत आहते. त्या अनुषंगाने डॉ. श्रृतीका ननावरे यांनी कामोठे सेक्टर 35 येथे नव्याने श्री डेंटल केअर हा दातांचा दवाखाना सुरू केला आहे. या दवाखान्याचे उद्घाटन बुधवारी झाले. परेश ठाकूर यांनी डॉ. श्रृतीका ननावरे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे कामोठे मंडळ अध्यक्ष रवि जोशी, शैलेश ननावरे आदी उपस्थित होते.